Thursday, October 26, 2023

सामाजिक आरोग्य..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक आरोग्य

शपथा खोट्या वाटू लागल्या,
आणा भाका खोट्या वाटू लागल्या.
अविश्वासाच्या शंका कुशंका,
सर्वांच्या मना-मनात दाटू लागल्या.

शंका आणि कुशंकांबरोबरच,
अविश्वासाचे वादळ उठले आहे.
ज्यांच्या त्यांच्या भोववताली,
संशयाचे दाट धुके दाटले आहे.

जो तो आपल्याच तोऱ्यात आहे,
जो तो आपल्याच हेक्यात आहे !
सामाजिक आरोग्य तर,
आज जरा जास्तच धोक्यात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
26ऑक्टोबर2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...