Friday, October 6, 2023

मुख्यमंत्री बदलाची चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

चर्चा एवढ्या खमंग होतात की,
त्यांचा कधीच अंत होत नाही.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा,
त्यामुळे कधीच शांत होत नाही.

एकाने चर्चेला पूर्णविराम देताच,
दुसरे प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
आपले होते मनोरंजन,
कुणी कुणी मात्र बकध्यान करतात.

ज्यांना व्हायचे असेल त्यांनी व्हावे,
ज्याला बसवायचे त्याला बसवा हो !
हम सब एक है....
लोकांच्या मनावर हे ठसवा हो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8373
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6ऑक्टोबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025