Saturday, June 17, 2023

राजकीय बेरकीपणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय बेरकीपणा

फक्त राजकारणी लोकच,
राजकारण खेळतात असे नाही.
फक्त राजकारणी लोकच,
कुठेही गोंडा घोळतात असे नाही.

आपल्या अवती भोवतीची,
गैरराजकारणी मंडळी हेच करतात.
आपला गैरसमज वाढत जातो,
राजकारणीच हे डावपेच करतात.

जसे मस्तवाल जनावरांपेक्षा,
गरीब जनावरेही मारकी असतात !
तसे आपल्या सभोवताला/ची माणसे,
राजकारण्यांपेक्षाही बेरकी असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8279
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जून2023

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...