Friday, June 2, 2023

महापुरुष जिंदाबाद !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
महापुरुष जिंदाबाद !
रस्ते,चौक,गल्ली आणि बोळांना,
आपल्या महापुरुषांची नावे आहेत.
महापुरुषांचे जसे गौरव आहेत,
तसेच त्यात राजकीय कावे आहेत.
राजकीय स्वार्थापोटी महापुरुष,
थेट रस्त्यावरती आणले गेले आहेत.
पुलापासून ते थेट विमानतळापर्यंत,
आपले महापुरुष विणले गेले आहेत.
कुणी नाणी आणि नोटांवर,
कुणी पोस्ट स्टॅम्पवर छापलेले आहेत!
कुणी उघड उघड;कुणी लपून छपून,
आपले महापुरुष ढापलेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6821
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
2जून2023

 

No comments:

daily vatratika...3april2025