Monday, April 7, 2025

लफड्याचे लफडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

लफड्याचे लफडे

यांचे त्यांच्याकडून डफडे आहे,
त्यांचे यांच्याकडून डफडे आहे.
एकूण निष्कर्ष काय तर?
त्यांचे आणि यांचेही लफडे आहे.

दोघांच्याही आरोपाचा सामना,
तसा खऱ्या अर्थाने टाय आहे.
परस्परांच्या लफड्यामध्ये
त्यांचा उघड उघड पाय आहे.

लफड्याचे वाजले डफडे,
प्रकरण खूपच नाजूक आहे !
ज्याला त्याला वाटू लागले,
जगात मीच फक्त साजूक आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8880
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7एप्रिल2025
 

No comments:

निमताळेपणा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- निमताळेपणा नको त्या गोष्टी;नको तशा, जाती धर्मावरती नेल्या आहेत. जातीय आणि धार्मिक भावना, नको तेवढ्या कोम...