Saturday, April 26, 2025

अविश्वसनीय....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------

अविश्वसनीय

जे आहे ते वास्तव आहे,
ही निरीक्षणे फक्त माझी नाहीत.
दहशतवादी हल्ल्यावरती,
विश्वास ठेवायला लोक राजी नाहीत

लोकांची प्रतिक्रिया जेवढी चिंताजनक,
त्यापेक्षाही प्रतिक्रिया घातक आहे.
लोकांच्या मनातील शंका कुशंकांचे,
हेच तर खरेखुरे द्योतक आहे.

लोकांना नको त्या शंका याव्यात,
ही खूप धक्कादायक बाब आहे !
सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये,
आता आपल्या स्वतःचीच आब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8899
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26 एप्रिल2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...