Sunday, October 24, 2021

क्रिकेटचा ' रन ' संग्राम... वात्रटिका मराठी

आजची वात्रटिका
----------------------

क्रिकेटचा ' रन ' संग्राम

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना,
नेहमी ' रणसंग्राम' ठरला जातो.
प्रासंगिक देशभक्तीच्या भावनेने,
क्रिकेटरसिकही भारला जातो.

सामना जसा मैदानात गाजतो,
तसा मैदानाबाहेरही गाजत राहतो!
ज्याचा त्याचा राजकीय ढोल,
जसा पाहिजे तसा वाजत राहतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7740
दैनिक झुंजार नेता
24ऑक्टोबर 2021

 

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...