Friday, October 29, 2021

हा खेळ आसवांचा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

हा खेळ आसवांचा

कोण जाणे खरे की खोटे?
त्यांच्या डोळ्यात आसू होते!
लोकांनी केला विनोद त्याचा,
लोकांच्या ओठावर हसू होते.

आसू आणि हसू कडे,
संशयास्पद लक्ष आहे !
हसावे कि रडावे कळेना!
याला हिटलरची साक्ष आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6154
दैनिक पुण्यनगरी
23मे 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026