Tuesday, October 5, 2021

ब्रँड नेम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ब्रँड नेम

तिकडे ड्रग्ज  घेतले जाते,
इकडे गांजाफुके आहेत.
श्रीमंत बाप घेतात बाजू,
गोरगरिब मात्र मुके आहेत.

श्रीमंतांना श्रीमंतीची,
गरीबांना श्रीमंतीची नशा आहे !
नशेचे ब्रँडनेम वेगळे असते,
नशेची सारखीच दशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7723
दैनिक झुंजार नेता
5ऑक्टोबर 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...