Tuesday, October 5, 2021

अरे बाप रे...!-मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अरे बाप रे...!

हा त्याची टाप काढतो आहे,
तो याचे माप काढतो आहे.
जो तो उठता-बसता,
एकमेकांचा बाप काढतो आहे.

जे शब्द खाजगीत काढतात,
ते शब्द  उद्या बाहेर पडू शकतात!
जाहीरपणे बाप काढणारे,
उद्या आय-मायही काढू शकतात!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6282
दैनिक पुण्यनगरी
5ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...