Friday, October 29, 2021

लवचिकता... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

लवचिकता

कुणी कुणाला पाठिंबा द्यावा?
याला मर्यादा राहिली नाही.
पाठिंब्याची एवढी लवचिकता
आम्ही पूर्वी पाहिली नाही.

देणारा-घेणारालाही कळेना
काय चांगले?काय वाईट आहे ?
पाठिंब्याच्या लवचिकतेमुळे
राजकीय हवा टाईट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7587
दैनिक झुंजारनेता
10मे2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...