Monday, October 18, 2021

बेहिशोबी मालमत्ता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

बेहिशोबी मालमत्ता

जगण्याचा हिशोब लागत नाही,
म्हणून इथे कुणी कुणी जगत नाही.
काही काही जणांच्या मालमत्तेचा,
अजिबातच हिशोब लागत नाही.

जसे कुणाचे मरणे बेहिशोबी आहे,
तसे कुणाचे जगणेही बेहिशोबी आहे, !
दुसऱ्याच्या मालमत्तेचा हिशोब,
तिसऱ्याने बघणेही बेहिशोबी आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6295
दैनिक पुण्यनगरी
18ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...