Saturday, October 16, 2021

हर्ष वर्धक विचार..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

हर्ष वर्धक विचार

मी भाजपात आलो,
मी बिनधास्त झालो,
असे त्यांचे निदान आहे.
आपला हर्ष वर्धन करणारे,
पाटलांचे विधान आहे .

ईडीचा सासेमिरा नाही,
धाडीमुळे डोके जाम नाही !!
कस काय पाटील?
बर हाय का?
या चौकशीचे काम नाही!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6293
दैनिक पुण्यनगरी
16ऑक्टोबर 2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...