Friday, October 15, 2021

दसरा मेळावे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
दसरा मेळावे
खरेतर जीवाचे शिवाला,
न सांगता कळावे.
पण मेळाव्यावर मेळावे,
आज दसरा मेळावे.
पंखात बळ भरल्याने,
कुठे मोठा फडफडाट होतो.
कुठे टाळ्यांच्या कडकडाटात
राजकीय 'गड'गडाट होतो.
नवे आदेश,नवे वारे,
नवी दिशा धरली जाते !
नव्या सीमोल्लंघनाची,
नवी आशा पेरली जाते!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6292
दैनिक पुण्यनगरी
15ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...