आजची वात्रटिका
------------------------
आरोप सम्राट
ढगात गोळ्या मारून,
विश्वासावर नांगर फिरवता येतो.
आरोप सम्राट होण्याचा,
आपला कंड जिरवता येतो.
इतरांवरचा विश्वास उडवताना,
आपलाच विश्वास उरावा लागतो!
ट्रकभर पुराव्याची गरज नाही,
एखादाच अस्सल पुरावा लागतो !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6280
दैनिक पुण्यनगरी
2 ऑक्टोबर 2021

No comments:
Post a Comment