Friday, October 1, 2021

श्वानवृत्ती.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

श्वानवृत्ती

ज्यांनी घोळला गोंडा,
तेच जीवाला घोर करतात.
ज्यांच्या दिला हातात हात,
तेच तंगडे वर करतात.

इमानी आणि बेईमानी,
दोन्हीही श्वानवृत्ती आहे !
जो भुंकणे दुर्लक्षितो,
त्याचेच नाव तर हत्ती आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7720
दैनिक झुंजार नेता
1 ऑक्टोबर 2021

 

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...