Monday, October 11, 2021

नाव छोटे,लक्षण खोटे !..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नाव छोटे,लक्षण खोटे !

शासकीय प्रोटोकॉलला,
उघड उघड फाटे होते.
उद्घाटनाच्या पत्रिकेवर,
नाव छोटे,लक्षण खोटे होते.

नारायण नारायण करून,
लावलेली कळ लागली!
चिपीच्या विमानतळाला,
शाब्दिक बाणांची
उद्घाटनालाच झळ लागली!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6288
दैनिक पुण्यनगरी
11ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...