Thursday, October 14, 2021

मुख्यमंत्रीपद..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मुख्यमंत्रीपद

कुणाला पडतात स्वप्न,
कुणाला असल्यासारखे वाटते.
हास्यास्पद विधानांनी,
धक्के बसल्यासारखे वाटते.

कुणी बघतोय दिवास्वप्न,
कुणी आठवणीत रंगतो आहे !
हा काही कल्पनाविलास नाही,
जे दिसते तेच सांगतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6291
दैनिक पुण्यनगरी
14ऑक्टोबर 2021

 

No comments:

क्रिकेटचा ' रन ' संग्राम... वात्रटिका मराठी

आजची वात्रटिका ---------------------- क्रिकेटचा ' रन ' संग्राम भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, नेहमी ' रणसंग्राम' ठरला जातो. प...