Saturday, October 23, 2021

लसोत्सव...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------

लसोत्सव

थाळ्या वाजवून वाजवून,
आपण कोरोना घरात घेतला.
आपले आगत स्वागत बघून,
कोरोनाही मात मात मातला.

आपला पाहुणचार बघून,
कोरोना लाजराबुजरा झाला !
तोपर्यंत तर देशभरात,
लसोत्सव साजरा झाला !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6301
दैनिक पुण्यनगरी
23ऑक्टोबर 2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...