Friday, October 29, 2021

लाटेचे टार्गेट....मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

------------------------


लाटेचे टार्गेट

पहिली आणि दुसरी आली,
आता तिसरी ची वाट आहे.
लाटे पाठोपाठ लाट,
कोरोना ची नवी लाट आहे.

कोरोना लाट येण्या अगोदरच,
लाटेचे टार्गेट फिक्स आहे !
संशय आणि आश्चर्यही,
कोरोना लाटेमध्ये मिक्स आहे !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6153
दैनिक पुण्यनगरी
22 मे 2021

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...