Saturday, October 2, 2021

सत्याचा प्रयोग.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्याचा प्रयोग

त्याने उजव्या गालात लगावली,
मी त्याच्या पुढे डावा गाल केला.
उजव्याप्रमाणे डावाही,
त्याने माझा गाल लाल केला.

मी रागाने लालेलाल झालो,
मला त्याचा पवित्र रूचला नाही!
तेवढ्यात तो बोलून गेला,
एवढे तरी बरे झाले;
मी अजून गांधी वाचला नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
2 ऑक्टोबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...