Friday, October 29, 2021

शुभमंगल ? सावधान !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

शुभमंगल ? सावधान !

बालविवाहाच्या समस्येवर
टिळा-कुंकवाचा उतारा काढला जातो.
सुधारणावादाच्या आशेवर
पळवाटांचा पोतारा ओढला जातो.

शॉर्ट बट स्वीट म्हणीत
बालविवाह उरकलेले असतात !
ज्यांच्या लक्षात वयाचा घोळ येतो,
ते  मनातून टरकलेले असतात !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------

 

No comments:

daily vatratika...29jane2026