Wednesday, October 20, 2021

दुःखाची स्वस्ताई... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

दुःखाची स्वस्ताई

निवडणूक आश्वासनावर,
भला मोठा पोतारा आहे.
वाढती सहनशीलताच,
महागाईवरचा उतारा आहे.

खिसे झाले फस्त,
दुःख मात्र स्वस्त झाले !!
महागाई सोसताना ,
एवढे नक्की रास्त झाले !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6297
दैनिक पुण्यनगरी
20ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...