Thursday, October 28, 2021

आरोपांचा नातेसंबंध.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

आरोपांचा नातेसंबंध

कधी मंत्र्यांवर आरोप,
कधी मंत्र्यांचे आरोप आहेत.
गोंधळात गोंधळाचे,
आपल्यासाठी निरोप आहेत.

असे काही नाही की,
हे फक्त आजच होते आहे!
मंत्री संत्री आणि आरोप,
यांचे जुनेच नाते आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6306
दैनिक पुण्यनगरी
28ऑक्टोबर 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...