Friday, October 8, 2021

धाडसत्र..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
धाडसत्र
धाड...धाड...धाड...
धाडीवर धाड आहे
ईडी साधीसुधी नाही,
भलतीच द्वाड आहे.
ज्यांच्यावर पडल्या धाडी,
त्यांची झाली दैना.
बायको विचारी नवऱ्याला,
वन्सच्या नावावर,
कारखाना तर नाही ना?
नवऱ्याचा वाढला बी.पी.,
वाढलेली शुगर आहे !
नवऱ्याच्या डोळ्यासमोर,
निकटर्तीयांची ' फिगर ' आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
8ऑक्टोबर 2021

No comments:

daily vatratika...3april2025