आजची वात्रटिका
------------------------
शैक्षणिक धडा
हात चोळीत बसण्याएवढे,
कोरोनाने हतबुद्ध केले.
ऑनलाइन शिक्षणाने,
ऑफलाइनचे महत्व सिद्ध केले.
ज्याला जसे पाहिजे तसे शिकावे,
शिकायला कशाचीच मना नाही!
ऑनलाइन शिक्षण
'लाईव्ह' असले तरी,
त्यात मुळीच जिवंतपणा नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7724
दैनिक झुंजार नेता
6ऑक्टोबर 2021

No comments:
Post a Comment