Friday, October 29, 2021

वादळ व्यवस्थापन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 
-----------------------

वादळ व्यव्थापन

याची आदळा आदळ असते,
त्याची आदळा आदळl असते.
आयुष्यात चोवीस तास,
वादळ एके वादळ असते.

वादळ तर येतच असतात;
त्याचे व्यवस्थापन करता यावे!!
वादळ वादळ होण्यापूर्वीच,
त्याला आवरून धरता यावे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
18 मे 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026