Sunday, October 24, 2021

कोरोना टार्गेट..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

कोरोना टार्गेट

कोरोनाने आपले टार्गेट,
शंभर टक्के साधले आहे.
ज्यांनी नाकारला कोरोना,
त्यांनासुद्धा बाधले आहे.

कोरोनाने सिद्ध केले,
तुमचा दावा खरा नाही !
आता तरी 'मनसे'मान्य करा,
राजहट्ट सर्वत्र बरा नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6302
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...