Showing posts with label राजहट्ट. Show all posts
Showing posts with label राजहट्ट. Show all posts

Sunday, October 24, 2021

कोरोना टार्गेट..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

कोरोना टार्गेट

कोरोनाने आपले टार्गेट,
शंभर टक्के साधले आहे.
ज्यांनी नाकारला कोरोना,
त्यांनासुद्धा बाधले आहे.

कोरोनाने सिद्ध केले,
तुमचा दावा खरा नाही !
आता तरी 'मनसे'मान्य करा,
राजहट्ट सर्वत्र बरा नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6302
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर 2021

 

Saturday, August 14, 2021

कोर्ट मॅटर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कोर्ट मॅटर

राज्यपाल हे पद
काही सटर-फटर नाही.
कोर्टसुद्धा म्हणाले,
हे आमचे मॅटर नाही.

पाचर हालवून,
खुट्टा परत घट्ट आहे!
हम करेसो कायदा,
हाही राजहट्ट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7675
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट 2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...