Sunday, August 2, 2026

बंडखोरांच्या टोळ्या.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
बंडखोरांच्या टोळ्या
कुणी परत यायला लागले,
कुणी परत जायला लागले.
ज्यांना पक्षात घेणार नव्हते,
त्यांनाच परत घ्यायला लागले.
आपल्यासाठी धक्कादायक,
त्यांना आवक-जावक सोपी आहे.
जाणारे येणारे खुशीत,
निष्ठावंतांची मात्र गळचेपी आहे.
एकूणच काय तर सगळीकडे,
निवडून येणाऱ्यांच्या मोळ्या आहेत !
आघाड्या आणि युत्या म्हणजे,
बंडखोरांच्या टोळ्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9356
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट 2026

 

No comments:

फसवणुकीचा खेळ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- फसवणुकीचा खेळ फसवा फसवीचे खेळ सुरू, बघा कोण कुणाला फसवतो आहे? फसवूनही न फसवल्याचे, बघा नेमके कोण भासवतो...