आजची वात्रटिका
----------------------------
चिंता आणि चिंतन
भ्रष्टाचार लपून-छपून नाहीतर,
भ्रष्टाचार खुलेआम होतो आहे.
ज्याची देण्या घेण्याची हिंमत आहे,
तो तर खुलेआम देतो घेतो आहे.
चिरीमिरी आणि चहापाणी,
ही तर भ्रष्टाचाराची झलक आहे.
देणारा आणि घेणारालाच कळतो,
असा भ्रष्टाचाराचा भाव फलक आहे.
मी मी म्हणणारा झुकवला जातो,
मी मी म्हणणारा झुकलेला आहे!
गरजवंताला अक्कल नसते,
भ्रष्टाचार ओळखून चुकलेला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9372
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment