Tuesday, August 11, 2026

सत्तेचे मायाजाल ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
सत्तेचे मायाजाल
जसे सत्तेसाठी एकवटले जातात,
तसे सत्तेसाठीच फुटले जातात.
त्यांचे राजकीय छक्के पंजे,
आपल्यालाही खरे वाटले जातात.
सत्ताधाऱ्यांचे नाव वेगळे तरी,
लाभार्थी तेच आणि तेच असतात.
त्यांच्या राजकीय डावपेचांचे,
आपल्यासमोर मात्र पेच असतात.
सगळेच आपल्याला फसवतात,
आपणही अलगद फसत जातो !
जोर का झटका धीरे धीरे,
आपणही सगळे सोसत जातो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9365
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 ऑगस्ट 2026
----------------------

 

No comments:

देशभक्तीची अडचण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ देशभक्तीची अडचण कुणाकडे देशभक्तीची युक्ती आहे, कुणावर देशभक्तीची सक्ती आहे. सगळीकडूनच अडचणीत, ...