Monday, August 17, 2026

पुरोगामीत्वाचा कस ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पुरोगामीत्वाचा कस
बाबा बुवा आणि भुतांनी,
आपला महाराष्ट्र झपाटला आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा खुट्टा,
सगळ्यांनी मिळून उपटला आहे.
सुशिक्षित आणि अशिक्षित,
यातून कुणीही सुटलेले नाही.
मेंदू गहाण ठेवायचा नसतो,
अजून कुणालाही पटलेले नाही.
श्रद्धा अंधश्रद्धांच्या चमत्कारांचा,
नवा अध्याय लिहिला जातो आहे !
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कस,
रोज नव्याने पाहिला जातो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9370
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 ऑगस्ट 2026

 

No comments:

गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग जो करायचा तेव्हा केला नाही, तोच गौप्यस्फोट मानला जातो. थोडक्यात काय शि...