Monday, August 10, 2026

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अज्ञानातला आनंद
एकदा भावना भडकल्या की,
वास्तवाचेही भान राहत नाही.
आपण निव्वळ अज्ञानी आहोत,
याचेही साधे ज्ञान राहत नाही.
भावनांच्या भडकत्या ज्वालांनी,
अज्ञानी लवकर चेतला जातो.
कळले आणि वळले नाही की,
अज्ञानातला आनंद घेतला जातो.
सगळेच अज्ञानी एकवटले की,
त्यांच्या आनंदालाही भरती नसते!
एकमेकांची तळी उचलत,
आपल्या अज्ञानाचीच आरती असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9364
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 ऑगस्ट 2026

 

No comments:

सत्तेचे मायाजाल ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सत्तेचे मायाजाल जसे सत्तेसाठी एकवटले जातात, तसे सत्तेसाठीच फुटले जातात. त्यांचे राजकीय छक्के प...