Tuesday, August 18, 2026

गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग
जो करायचा तेव्हा केला नाही,
तोच गौप्यस्फोट मानला जातो.
थोडक्यात काय शिळ्या कढीला,
पुन्हा नव्याने उत आणला जातो.
सहेतुक गौप्यस्फोटांची झळ,
नको त्यालाच बसायला लागते.
गौप्यस्फोटांची शिळी कढी मग,
जोर जोरात फसफसायला लागते.
ज्याने केला गौप्यस्फोट,
त्याची घुसमट बाहेर येऊन जाते!
गौप्यस्फोटांच्या मिसटाइमिंगमुळे,
गौप्यस्फोटांचे हसू होऊन जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9371
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 ऑगस्ट 2026
----------------------------

 

No comments:

गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- गौप्यस्फोटांचे मिसटाइमिंग जो करायचा तेव्हा केला नाही, तोच गौप्यस्फोट मानला जातो. थोडक्यात काय शि...