आजची वात्रटिका
------------------------------
*करावे तसे भरावे*
कधी यांच्याकडून वार आहे,
कधी त्यांच्याकडून वार आहे.
परस्परांच्या जातीय अस्मितांना,
परस्परांकडूनच धार आहे.
जातीय अस्मिता झाल्या धारदार,
बाकी सगळे बोथट बोथट आहे.
धारधार जातीय अस्मितांवरतीच,
आज अनेक जणांचे पोट आहे.
पोटभरूंनो खुशाल पोट भरा,
त्यामुळे आमचे पोट दुखत नाही !
करावे तसे भरावेच लागते,
हा नियम कुणालाच चुकत नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9367
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 ऑगस्ट 2026
---
No comments:
Post a Comment