Wednesday, August 12, 2026

देशभक्तीची अडचण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
देशभक्तीची अडचण
कुणाकडे देशभक्तीची युक्ती आहे,
कुणावर देशभक्तीची सक्ती आहे.
सगळीकडूनच अडचणीत,
आज तुमची आमची देशभक्ती आहे.
कुणी खरा इतिहास बघत नाही,
कुणी खाल्ल्या मिठाला जागत नाही.
एवढे तरी किमान बरे आहे,
देशभक्ती आज बलिदान मागत नाही.
अज्ञान,अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचार,
यांना चले जाव म्हणण्याची वेळ आहे !
ज्याच्या त्याच्या सोयीने खेळला जातो,
असा आज देशभक्तीचा खेळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9366
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 ऑगस्ट 2026

No comments:

देशभक्तीची अडचण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ देशभक्तीची अडचण कुणाकडे देशभक्तीची युक्ती आहे, कुणावर देशभक्तीची सक्ती आहे. सगळीकडूनच अडचणीत, ...