आजची वात्रटिका
----------------------------
टॅक्ट आणि फॅक्ट
चर्चेने प्रश्न सुटले नाहीत तर,
प्रश्नांना भावनिक केले जाते.
कसली तरी भीती दाखवून,
लोकांना पॅनिक केले जाते.
एकदा लोक पॅनिक झाले की,
त्यांना पाहिजे ते टॉनिक देता येते.
लोकांची इच्छा असो वा नसो,
त्यांना हवे तसे वापरून घेता येते.
एकदा लोक पघळले की,
साधे प्रश्नही चिघळले जातात !
चर्चेच्या नावाखाली मग,
जुनेच कोळसे उगळले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9374
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 ऑगस्ट 2026
----------------------------
नमस्कार,

No comments:
Post a Comment