आजची वात्रटिका
----------------------------
झोपेचे सोंग
मेंदू बधिर झालेल्यांना,
पुन्हा पुन्हा डागवावे लागते.
झोपेचे सोंग घेतलेल्यांना,
पुन्हा पुन्हा जागवावे लागते.
जागृतीचे आशादायी चिन्ह,
निराशेमध्ये लोपले जातात.
तेवढ्यापुरते होतात जागे,
पुन्हा गाढ झोपले जातात.
झोपेचे सोंग घेण्यातच,
इथे धन्यता मानली जात आहे!
सामाजिक अधोगतीमध्ये,
समाजाचाच मोठा हात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------फेरफटका- 9375
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment