Sunday, August 23, 2026

तरुणोदय ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
तरुणोदय
तरुणांमध्ये अन्यायाची चीड आहे,
तरुणांमध्ये प्रचंड जोश आहे.
आता खात्री पटायला लागली,
आपला भारत तरुणांचा देश आहे.
जसा तारुण्याचा जयजयकार आहे,
तशी तारुण्याची आळवणी आहे.
इथून तिथून सगळ्यांकडूनच,
तरुणाईशी हातमिळवणी आहे.
जेन झीच्या पावलावरती,
जेन अल्फाचेही पाऊल आहे !
नव्या भारताच्या तरुणोदयाची,
ही आश्वासक अशी चाहूल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका- 9376
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 ऑगस्ट 2026

 

No comments:

तरुणोदय ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- तरुणोदय तरुणांमध्ये अन्यायाची चीड आहे, तरुणांमध्ये प्रचंड जोश आहे. आता खात्री पटायला लागली, आपल...