Tuesday, August 25, 2026

इमानदारीचा डंका....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
इमानदारीचा डंका
कालपर्यंत केला संघर्ष ज्यांनी,
जर का ते गप गुमान झाले.
तर समजण्यास हरकत नाही,
ते स्वतःशीच बेईमान झाले.
केली स्वतःचीच किंमत त्यांनी,
स्वतःकडून स्वतःची बोली आहे.
खुजी झाली उंची त्यांची,
आज उघड त्यांची खोली आहे.
साऱ्याच बेइमानदारांकडून,
आपल्या इमानदारीचा डंका आहे !
परस्परांच्या इमानदारीवर,
साऱ्या बेइमानदारांकडून शंका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9378
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 ऑगस्ट 2026
----------------------------
नमस्कार,

 

No comments:

इमानदारीचा डंका....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- इमानदारीचा डंका कालपर्यंत केला संघर्ष ज्यांनी, जर का ते गप गुमान झाले. तर समजण्यास हरकत नाही, ते...