आजची वात्रटिका
------------------------------
स्वातंत्र्योत्तर जबाबदारी
स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर,
तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे.
कुणातरी विरुद्ध लढायचे म्हणून,
आज आपसामध्येच लढणे चालू आहे.
ज्याचा त्याचा वेगवेगळा झेंडा आहे,
ज्याचा त्याचा वेगवेगळा नारा आहे.
आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यावरती,
सगळ्याच आयतोबांचा तोरा आहे.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नाही,
ते टिकविण्यासाठी खपले पाहिजे!
इतरांबरोबर आपलेही स्वातंत्र्य,
आपण प्राणपणाने जपले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9369
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 ऑगस्ट 2026

No comments:
Post a Comment