Friday, October 29, 2021

महा परीक्षा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------


महा परीक्षा

जे आधीच नागडे होते,
त्यांना अजूनच नागडे केले.
मानवतेचे अनेक पदर,
एका कोरोनाने उघडे केले.

दुर्जनावढाच सज्जनांनाही,
कोरोनाचा तडाखा आहे !
अनेक परीक्षा रद्द करून,
कोरोना महापरीक्षा बघतोय,
असा आमचा आडाखा आहे!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6152
दैनिक पुण्यनगरी
21 मे 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...