Friday, October 29, 2021

अंदर-बाहर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 

-----------------------------

अंदर-बाहर

कुणाला क्लिन चिट वाटू लागले,
कुणी कुणी जामिनावर सुटू लागले.
सर्वांच्या अस्वस्थ कार्यकर्त्यांना
आता चांगलेच हायसे वाटू लागले.

कुणी आले बाहेर,
कुणी आत जायच्या वाटेवर आहेत !
भविष्याच्या चिंतेने
कुणी अगोदरच खाटेवर आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7585
दैनिक झुंजार नेता
6मे2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026