Showing posts with label सूर्यकांत डॊळसे. Show all posts
Showing posts with label सूर्यकांत डॊळसे. Show all posts

Friday, March 3, 2023

गाईड म्हणाले पुस्तकाला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आठवणीतील वात्रटिका
------------------------
गाईड म्हणाले पुस्तकाला
गाईड म्हणाले पुस्तकाला,
तुझे आपले चांगले आहे.
आम्हांला मात्र दोरीवरती,
आयुष्यभर टांगले आहे.
परीक्षेचा मोसम आला की,
बाबा अंगावर काटा येतो.
पोरासाठी बापही मग,
पाहिजे तेवढ्या नोटा देतो.
आमची 'चिरफाड' करूनसुद्धा
उत्तरपत्रिका कोऱ्या असतात !
पोरासोबत बापाच्याही,
गुणवाढीसाठी फेऱ्या असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-433
दैनिक झुंजार नेता
वर्ष -2रे
26 फेब्रुवारी2001

Friday, October 29, 2021

कोरोनाचा काळाबाजार.. मराठी वात्रटिका

--------------------------------

कोरोनाचा काळाबाजार

इकडे कोरोनामुळे,
प्रत्येक जण बेजार आहे.
तिकडे मात्र कोणाच्या नावावर,
चक्क काळाबाजार आहे.

कोरोना हा असा,
एकच आजार आहे!
ज्याच्या प्रत्येक गोष्टीत,
मोठा काळाबाजार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7597
दैनिक झुंजार नेता
20मे2021
-------------------

 

Thursday, October 21, 2021

तोंड पूजा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

तोंड पूजा

तोंडपूजेला महत्त्व आले,
लोकही मग तोंडपूजे झाले.
आरत्या-किर्त्या तोंडपाठ,
लोकही मग बिनलाजे झाले.

आपल्या तोंडपूजेची,
कुठे कुणाला लाजलज्जा आहे?
ज्यांना जमतो तोंडदेखलेपण,
त्यांचीच खरी आज मज्जा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7737
दैनिक झुंजार नेता
21ऑक्टोबर 2021

 

Wednesday, October 20, 2021

दु:ख हरण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
दु:ख हरण
आरोप - प्रत्यारोप करून,
ते दिवस काढत आहेत.
मात्र आपल्याला वाटते,
आपल्यासाठी लढत आहेत.
कधी ढासळतो तोल,
कधी जीभ घसरून जाते!
त्यांची जुगलबंदी रंगली की,
आपले दुःख विसरून जाते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7736
दैनिक झुंजार नेता
20ऑक्टोबर 2021

 

Wednesday, September 29, 2021

कोरोना श्री...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना श्री

गाळलेल्या सगळ्या जागा,
राजकारणी भरीत राहिले.
लॉक डाऊन च्या काळात,
लोकरंजन करीत राहिले.

राजकारण्यांचे लोकरंजन,
जसे टॅक्स फ्री होते,
तसेच ते टेन्शन फ्री होते!
कुणी होते कोरोना योद्धे,
कुणी 'कोरोना श्री' होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7718
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर 2021

 

Thursday, September 23, 2021

साहेबीपणाची हौस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
साहेबीपणाची हौस
चिम्या गोम्या आणि सोम्यालाही,
साहेब म्हणून मिरवावे वाटते.
लोकांनीही आपले मागणे,
उठता बसता पुरवावे वाटते.
चिम्या गोम्या सोम्याचीही हौस,
लोक बिनधास्त पुरवून टाकतात!
गाढवाला गोपाळराव म्हणीत,
त्यांचा कंड जिरवून टाकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7712
दैनिक झुंजार नेता
23सप्टेंबर 2021

 

Sunday, September 19, 2021

त्रिकोणी संसार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

त्रिकोणी संसार

एकीकडे सुन आहे,
दुसरीकडे सासरा आहे.
तिघाडीचा संसार म्हणजे,
दोघांमध्ये तिसरा आहे.

सुतावरून गाठतात स्वर्ग,
सतत पराचा कावळा आहे!
गोंधळात गोंधळ असूनही,
तोही एकदम सावळा आहे

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7709
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर 2021

 

Monday, September 6, 2021

खोट्याच्या पदरी गोटा..मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

खोट्याच्या पदरी गोटा

एकाला छोटे ठरवून,
दुसऱ्याला मोठे करू नका.
खंडन आणि मंडन,
दोन्हीसुद्धा खोटे करू नका.

आपला आणि दुसऱ्याचाही,
त्यात खूप मोठा तोटा असतो!
हे सांगायची गरज नाही,
खोट्याचा आवाज मोठा असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7695
दैनिक झुंजार नेता
6सप्टेंबर 2021

Saturday, September 4, 2021

जातीचे अमरत्व..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जातीचे अमरत्व

जात कर्माने नाही;जन्माने मिळते,
तरी जात मृत्यूनंतरही सुटत नाही.
जात दाखविल्याशिवाय प्रेताला,
साधा मसनवटाही भेटत नाही.

प्रेताबरोबर वैर धरण्याचे,
तसे खरेच काही कारण नाही !
माणसाला मरण असले तरी,
जातीला मात्र नक्की मरण नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7693
दैनिक झुंजार नेता
4सप्टेंबर 2021

 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...