Sunday, May 22, 2022

पक्षीय चौकट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पक्षीय चौकट

सुखावता नाही आले तरी,
कुणाला दुखावून चालत नाही.
मताच्या राजकारणात,
समाजकारण पेलत नाही.

काही खटकले,डोके सटकले,
तरीही तोल सावरावा लागतो !
पक्षीय राजकारणा्पुढे,
सडेतोडपणा आवरावा लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7936
दैनिक झुंजार नेता
22मे2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...