आजची वात्रटिका
------------------------
धोक्याचा इशारा
अमुक खतरेमें आहे,
तमुक खतरेमें आहे.
तोपर्यंत हे होतच राहणार,
जोपर्यंत देव फतरेमें मे आहे.
देश फक्त दगडांचा नसतो,
त्याहून माणूस महत्त्वाचा असतो.
दुर्दैवाने वेळ अशी येते,
जिथे खरा प्रश्न सत्वाचा असतो.
त्यांना माणूस दिसतच नाही,
दगडच ज्यांच्या डोक्यात आहे !
कितीही डोके फोडून सांगा,
देशाची अखंडता धोक्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6479
दैनिक पुण्यनगरी
20मे2022
No comments:
Post a Comment