Saturday, May 7, 2022

हाताची घडी तोंडावर बोट.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

हाताची घडी तोंडावर बोट

कमळाची चालली मळमळ,
वाघाची बाणाबाणी आहे.
घड्याळ अलाराम देतेय,
ही तर आणीबाणी आहे.

कुणी वाढवतोय वाद,
कुणी वाद टाळीत बसला आहे !
सगळ्यांचा प्रचंड गाजावाजा,
हात मात्र चोळीत बसला आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7921
दैनिक झुंजार नेता
7मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...