Saturday, December 17, 2022

बेशरम रंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

बेशरम रंग

रंगाचा होतोय बेरंग,
त्याचे कारण खूप डीप आहे.
तथाकथित धर्मरक्षकांची,
एक छुपी सेन्सॉरशिप आहे.

उद्या समांतर सेन्सॉशिपकडे,
सगळेच चित्रपट न्यावे लागतील.
उद्या आपली अंतर्वस्त्रेही,
सेन्सॉर करून घ्यावे लागतील.

नकारात्मक प्रसिद्धीखाली,
मूळ मुद्दा झाकला गेला आहे !
बिकिनीचा नागवेपणा,
बेशरम रंगात माखला गेलाआहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6663
दैनिक पुण्यनगरी
17डिसेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...