Tuesday, December 13, 2022

महागाई दर्शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

महागाई दर्शन

ग्रामपंचायतची निवडणूक,
कुणाला केवढ्याला पडली आहे?
निवडणुकीचा खर्चही सांगतो,
महागाई खूप वाढली आहे.

विकत घेणारे वाढले,
विकणारे मात्र स्वस्त झाले !
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
सगळ्यांचे भाव रास्त झाले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8121
दैनिक झुंजार नेता
13डिसेंबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...